वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079846 · अभंग क्र. ३५४८

3548.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
एवढा संकोच तरि का व्यालासी । आह्मी कोणांपाशी तोंड वासू ॥१॥
कोण मज पुसे सिणले भागले । जरी मोकलिले तुह्मी देवा ॥धृपद॥
कवणाची वाट पाहो कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥२॥
कोण जाणे माझे जीवीचे साकडे । उगवील कोडे संकटाचे ॥३॥
तुका म्हणे तुह्मी देखिली निश्चिंती । काय माझे चित्ती पांडुरंगा ॥४॥

अर्थ :
तुझ्याजवळ आम्ही निरोप पाठवला आणि त्या निरोपाविषयी तुला उत्तर दयायचे तर इतका संकोच तुला वाटतच होता तर आम्हाला तू जन्मालाच का घातलेस तुझ्यावाचून देवा आम्ही कोणापुढे तोंड वासावे ? देवा अरे तू जर आमचा असा त्याग केलास तर आम्ही थकलो त्रासलो तर तुझ्यावाचून आमची दुसरी कोण विचारपूस करणार आहे. देवा मी कोणाची वाट कोणीकडे पाहू मला प्रेमाने जवळ ओढून घेईल असा जिवलग कोण आहे ? देवा माझ्या जीवाचे साकडे कोण जाणून घेईल कोण माझ्या संकटाचे कोडे सोडवील ? तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा माझ्या चित्तामध्ये निश्चिंती आहे असे तुम्हाला वाटले आहे की काय ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग