वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

मी तो दरिद्री नाही ज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084171 · अभंग क्र. ३५७४

3574.
मी तो दरिद्री नाही जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आता ॥१॥
या नामयाचें कैसे होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥
आमुचा घराचार येणे बुडविला । पोर फ़ितविला काय करु ॥३॥
या विठोबाचा येणे धरिलासे छंद । आमुचे जाहलें धिंद जगामाजीं ॥४॥
एका जनार्दनी कोणा सांगूं गुज । कोण आहे मज जीवलग ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग