वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079442 · अभंग क्र. ३५८०

3580.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येत वारकरी होत वाटे ॥१॥
देखिले सोहंळे होती आठवण । चालती ते मात करूनिया ॥धृपद॥
केली आइकिली होईल जे कथा । राहिले ते चित्ता होईल प्रेम ॥२॥
गरुडटके टाळ मृदंग पताका । सांगताती एकाएक सुख ॥३॥
तुका म्हणे आता येती लवलाही । आळिंगूनि बाही देईन क्षेम ॥४॥

अर्थ :
पंढरीहून मागे फिरल्यानंतर वारकऱ्यांची मी वरती सांगितलेल्याप्रमाणे अवस्था झाली असेल व आता ते देहूच्या वाटेने माघारी येत असतील. पंढरीला जात असताना जो भजन किर्तनाचा सुख सोहंळा वारकऱ्यांनी अनुभवला त्याविषयीच ते आठवण काढीत असतील व वाटेने चालत असताना त्याचविषयी गप्पागोष्टी आता करत असतील. वारकऱ्यांनी पंढरीला जाताना व पंढरीत गेल्यानंतर ज्या कथा केल्या असतील किंवा ऐकल्या असतील त्या कथेविषयीच त्यांच्या चित्तामध्ये दृढ प्रेम उत्पन्न्‍ झाले असेल. पंढरीला जात असताना वारकऱ्यांच्या हातामध्ये गरुड टके, टाळ, मृदुंग, वीणा, पताका यांच्यापासून त्यांना जे सुख झाले आहे ते सुख ते एकमेकांना सांगत असतील. तुकाराम महाराज म्हणतात, आता वारकरी लवकरच देहूमध्ये येतील मग मी त्यांना माझे दोन्ही बाहू पसरुन त्यांना क्षेम आलिंगन देईन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग