वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079514 · अभंग क्र. ३५५८

3558.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
न बैससी खाली । सम उभाच पाउली ॥१॥
ऐसे जाले बहुत दिस । जाली युगे अठ्ठाविस ॥धृपद॥
नाही भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥
तुका म्हणे किती । मापे केली देती घेती ॥३॥

अर्थ :
देवा तू कधीही खाली बसत नाही किती दिवस झाले तसा दोन्हीही समचरण ठेवून तू विटेवर तसाच उभा आहेस. देवा तू विटेवर तुझे दोन्हीही समचरण ठेवून उभा राहून कितीतरी दिवस म्हणजे अठ्ठावीस युग झाले आहेत. देवा असे असले तरी देखील तुला काही त्रास शीण होत नाही एक क्षण देखील तू आराम करत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू कितीतरी वेळा भक्तांजवळ देण्याघेण्याचे माप केले आहेस त्याला काही गणती नाही व आम्हालाही काही कळत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग