येऊनी राउळा सांगे वि
3578.
येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥
उदईक कापड घेऊनि बाजारासी जातो । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥
व्यापार करावा तो कैसा मी नेणे । जन्मोनि पोसणे तुमचे देवा ॥३॥
आले जे भोगांसी ते करणे लागे । एका जनार्दनी सांगे गुज देवा ॥४॥
