वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079452 · अभंग क्र. ३५८८

3588.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
वियोग न घडे सन्निध वसले । अखंड राहिले होय चित्ती ॥१॥
विसरु न पडे विकल्प न घडे । आले ते आवडे तया पंथे ॥धृपद॥
कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिके ॥२॥
निरोपासी काज असो अनामिक । निवडिता एक नये मज ॥३॥
तुका म्हणे हित चित्ते ओढियेले । जेथे ते उगले जावे येणे ॥४॥

अर्थ :
देवाचा वियोग जर झाला नाही तर देव सतत आपल्याजवळच राहतो परंतू जर देवाचा वियोग जर झाला तर आपल्याला एक लाभ होतो तो लाभ म्हणजे देव आपल्या चित्तामध्ये अखंड राहातो. त्यानिमित्ताने देवाचा विसर घडत नाही मनात विकल्प उत्पन्न होत नाही आणि जे माझ्या माहेराहून येतात ते मला फार आवडतात. देव अखंड चित्तामध्ये राहिला की कामाचा विसर पडतो शरीराची आठवण राहात नाही कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाताना ते मधूर आहे की फिके आहे हे कळत नाही. देवाकडून माझ्यासाठी निरोप घेऊन येणारा व्यक्ती अत्यंज म्हणजे हीन जातीचा जरी असला तरी मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही तो कोणत्याही जातीचा असो मी त्याच्यामध्ये चांगला किंवा वाईट असा भेद निवडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवापासून अलिप्त परंतू अखंड देवाचे चिंतन ज्याच्या चित्तामध्ये चालू असते त्याच्याजवळ हित आपोआप ओढले जाते जेथे हरीचे चिंतन नेहमी चालू असते तेथे हित त्याच्याकडे आपोआप ओढले जाते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग