(पंढरीस जाणाऱ्या वार
3556.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
जोडीच्या हव्यासे । लागे धनांचेंचि पिसे ॥१॥
मग आणीक दुसरे । लोभ्या नावडती पोरे ॥धृपद॥
पाहे रुक्याकडे । मग अवघे ओस पडे ॥२॥
तुका म्हणे देवा । तुला बहुताचा हेवा ॥३॥
अर्थ :
एकदा की मानवाला धनाचा साठा करण्याचा हव्यास लागला की तेच वेड त्याला कायम लागते मग त्या लोभी मनुष्याला दुसरे काहीही आवडत नाही अगदी आपले मुले सुध्दा आवडत नाहीत. असा लोभी मनुष्य नेहमी रुपयांकडे पाहातो रुपयापुढे त्याला सर्व ओस पडलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला देखील असाच हव्यास आहे साऱ्या जगाचा तुला हव्यास असल्यामुळे आमच्यासारख्या लेकरांकडे तुझे लक्षच नाही.
