वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

त्रिभुवनीचे सुख एकतत

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075200 · अभंग क्र. १०८

108.
त्रिभुवनीचे सुख एकतत्त्व विठ्ठल ।
नलगे आम्हा मोल उच्चारिता ॥
विठ्ठल उघडा मंत्र कळिकाळा त्रास ।
घालूनिया कास जपो आधी ॥
सत्वर सत्वाचे जपती नामावळी ।
नित्यता अंघोळी घडे रया ॥
बापरखुमादेविवरु जिव्हाळा ह्रदयी ।
जीवाचा जीव ठायी एक पाही ॥

अर्थ :
त्रिभुवनाचे सुख असणारा श्री विठ्ठल असुन त्याचे नाम उच्चारायला कोणतेच मोल द्यावे लागत नाही. कंबर बांधुन म्हणजे निर्धार करुन हा नाममंत्र उच्चारला तर त्याचा धाक कळीकाळाला असतो. ह्या सत्वनामाची नामावळी जपली की सुखाचे सचैल स्नान सहज घडते. सर्व जीवांच्या ठायी असणारे तेच माझे पिता व रखुमाईचे पती आहेत असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग