वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

म्हणे बा गौळणीचिया र

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089867 · अभंग क्र. ११०

110.
म्हणे बा गौळणीचिया रागे ।
तुज म्या बांधले रे प्रसंगे ।
तव त्वा उपटूनिया श्रीरंगे ।
उखळ येथे अडकविले ॥१॥
परी ते नयेचि तुज उगविता ।
म्हणोनिया बळे ओढिले ताता ।
तव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता ।
अदृष्टे आमुच्या वांचलासी ॥२॥
मग त्या म्हणती गौळणी नारी ।
खेद न करी वो सुंदरी ।
त्वांचि हा परमात्मा श्रीहरि ।
मारिला होता निज हस्ते ॥३॥
गत गोष्टी काय ते आता ।
न करी यावरी जिवा परता ।
उदंड गाहाणींही सांगता ।
तू ते तत्वता मानू नको ॥४॥
आजींचाचि पाहे पा अनर्थ ।
केवढा चुकला अवचिता घात ।
अदृष्टाचा हा कृष्णनाथ ।
म्हणोनिया वांचला निज भाग्ये ॥५॥
आता तरी सांभाळुनी ।
पहा हा भ्याला असेल मनी ।
हे केवढे वृक्ष पडिले अवनी ।
घोर घोषे दणाणिले ॥६॥
निळा म्हणे यावरी यशोदा ॥
पुसे भ्यालासि बारे गोविंदा ।
तव तो हासोनिया गदगदा ।
म्हणे मज भ्य कोणाचे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग