पाहो जो गेलिया मीच ह
110.
पाहो जो गेलिया मीच हरपलिये ।
नवल कैसे जाले बाईयांनो ॥१॥
काय सांगो कैसे विपरीत चोज ।
पडिले माझे मज ठक कैसे ॥२॥
देखत देखता अंगी संचारले ।
नाठवसे जाले मी हे माझे ॥३॥
बहेणि म्हणे नवल सांगो कोणापासी ।
माझे मी मानसी लाजिलिये ॥४॥
