वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

कारण परिसणा कामधाम न

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090126 · अभंग क्र. १११

111.
कारण परिसणा कामधाम नेम । सर्वआत्माराम नेमियेला ॥१॥
ते रूप सुंदर सर्वागोचर । कृष्ण परिकर गोपवेषे ॥२॥
वेदादिक कंद ऊँकार उद्बोध । साकार प्रसिद्ध सर्वाघटी ॥३॥
निवृत्ति म्हणे धाम कृष्ण हा परम । सौख्यरूपे सम वर्ततसे ॥४॥

अर्थ:
माझ्या सर्व इच्छा, सर्व कर्म, सर्व नित्यनेम हा तोच झाला असुन त्याच्याच मुळे मला आत्मभान स्वरुपात भगवंत जाणवला आहे. तेच कृष्णरुप सर्वांग सुंदर देखणे असुन गोकुळात अवतरुन सर्वाना प्राप्य आहे.सर्व वेदांचे सार जसे ॐकार प्रणवात एकवटले आहे. तसेच तो ॐकार त्या ब्रह्मस्वरुपातुन प्रतित होतो.निवृत्तिनाथ म्हणतात, तो भगवंत सर्व धामामध्ये संपुर्ण भरला असुन तो स्वानंद स्वरुपात सौख्य प्रदान करत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग