सदा नाम घोष करु हरिक
112.
सदा नाम घोष करु हरिकथा । तेणे सदा चित्ता समाधान ॥१॥
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार । आनंदे निर्भर डुलतसो ॥२॥
असो ऐसा कोठे आठवचि नाही । देहींच विदेही भोगु दशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरुप । लागो नेदू पापपुण्य अंगा ॥४॥