अहो द्रौपदीच्या बंधू
113.
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ॥1॥
पांचाळीसी वस्त्रे देत । पुरवितो जगन्नाथ ॥2॥
जनी म्हणे भाग्यवंत । तिच्या भावाचा अंकित ॥3॥
खांदीऋषि तो चालिला । बळीने द्वारपाळ केला ॥1॥
ऐसा भक्ता आधिन होसी । त्याच्या वचने वर्तसी ॥2॥
कष्टी होता अंबऋषी । त्याचे गर्भवास सोसी ॥3॥
सर्व दुःखासी साहिले । जनी म्हणे दळण केले ॥4॥
