अनंत रचना हारपती ब्र
108.
अनंत रचना हारपती ब्रम्हांडे । हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥
ते रूप राजस वसुदेव भोगी । देवक्रीयेलागी वोळलासे ॥२॥
विचित्र रचना ब्रम्हांड कुसरी । निरालंब हरि गोकुळी वसे ॥३॥
निवृत्ति संपदा गाताती गोविंदा । भोगिती मुकुंदा निजबोधे ॥४॥
अर्थ:
अनंत जगाची रचना तो करतो व त्याच्याच ठिकाणी त्या जगताचा लय होतो. त्याच रुपाने देवकीच्या उदरातुन जन्म घेतला व वसुदेवाने पिता होण्याचे सुख.त्याच रुपाने आधी विविध रुपात जगताची निर्मीती केली व नंतर कृष्ण बनुन तो गोकुळात अवतरला. निवृत्तिनाथ म्हणतात, मी माझ्या बौध्दिक संपदेने त्या गोविंदाचे वर्णन गाऊन त्याच्या मुकुंद स्वरुपात आत्मबोधाचा आनंद घेत आहे.
