भवसिंधु तराया एकचि उ
107.
भवसिंधु तराया एकचि उपाय । ध्यावे तुझे पाय वासुदेवा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥२॥
नारायण नारायण करी जो पारायण । तो उद्धरे जाण इहलोकी ॥३॥
तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवा उद्धरणा नाम स्मरा ॥४॥
अहर्निशी कीर्ति गाती भाविक भोळे । त्यांनी तुज जिंकिले ब्रह्मा म्हणे ॥५॥
नामा ह्मणे ऐसे दाविले सुगम । नलगे तुह्मा नेम नाना कोटी ॥६॥
