वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

गेलिया वृंदावना तेथे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073233 · अभंग क्र. ११३

113.
गेलिया वृंदावना तेथे देखिला कान्हा । संवगडियामाजी उभा ध्यान लागले मना ॥१॥
हरिनाम गोड झाले काय सांगो गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठे न राहे ॥२॥
त्याचे मुख साजिरे वो कुंडले चित्त चोरे । सांडुनी अमृत धनी लुब्धली चकोरे ॥३॥
सांडुनी धृवमंडळ आली नक्षत्रमाळा । कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळा ॥४॥
सांडुनी मेघराजु कटिसूत्री तळपे विजू । भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥
सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज । अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिका सहज ॥६॥
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू । भेदली हरिचरणी पायी मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥
त्याचे पायींची नेपुरे वाजती वो गंभीरे । लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरे ॥८॥
आणिक एक नवल कैसे स्वर्गी देव झाले पिसे । ब्रम्हादिक उच्छिष्ठालागी देखा जळी झाले मासे ॥९॥
आणिक एक नवल परी करी घेऊनि शिदोरी । सवंगड्या वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग