तेणे दणणिंले गोकुळ
109.
तेणे दणणिंले गोकुळ ।
उतरंडीहि खचल्या सकळ ॥
धाविन्नले गौळी आणि गोवळ ।
म्हणती हा रवकल्लोळ कशाचा ॥१॥
तव ते देखती अवघे नयनी ।
वृक्ष पडिले ते उन्मळोनी ।
आश्रचर्य करिती आपुलाले मनी ।
म्हणती हे कैसेनी उलंडले ॥२॥
यशोदा सांगे तयांप्रती ।
बांधला होता म्या श्रीपती ।
तेणे येऊनिया आचिती ।
उखळ वृक्षाबुडी अडकविले ॥३॥
गौळणी सांगता गाहाणे ।
मीहि संतापले मने ।
तेणे गळा बाधोनिया तान्हे ।
उखळेंसी म्या ॥४॥
गेले आणिकिया कामासी ।
कृष्णे उपडूनिया उखळासी ।
वृक्ष मोडियेले आवेशी ।
माजी आपणही पडियेला ॥५॥
थोर चुकले हे अरिष्ट ।
तळी सांपडता होता पिठ ।
ऐसे बोलोनिया अदृष्ट ।
ताडी आपुलिया निज करे ॥६॥
निळा म्हणे घेउनी त्यासी ।
सफुंदे यशोदा उकसाबुकसी ।
म्हणे माझिया हषिकेशी ।
कोणीहि देखो न शकती ॥७॥
