वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

सोनियाचा दिवस आजि अम

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075031 · अभंग क्र. ११३

113.
सोनियाचा दिवस आजि अमृते पाहाला ।
नाम आठविता रूपी प्रकट पै झाला ॥
गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना ।
आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥
तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायी ।
बापरखुमादेविवरावाचूनि आनु नेणे काही ॥

अर्थ :
आजचा दिवस सोन्याचा आहे कारण नुसते नामस्मरण करायचे आठवले तर तो परमात्मा नामरुपानेच प्रगट झाला. हे गोपाळा तुझे ध्यान सतत माझ्या मनाला लागो तसे झाले तर हे जगजीवना मी क्षणभर ही नामस्मरण करताना विसंबणार नाही. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाखेरीज मी अन्य ठिकाणी काय वाचा मनाने विनटलो नाही असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग