कृष्णाला भुलविले गोप
111.
कृष्णाला भुलविले गोपीने ॥धृ.॥
यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥
नंदजी तुमचा कृष्ण लाडका । हाका मारितो मोठ्यानें ॥२॥
वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवानें ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेने । नाही ऐकिले मातेने ॥४॥
