ब्रम्हरस गोडी तयासी
114.
ब्रम्हरस गोडी तयासी फावली । वासना निमाली सकळ ज्याची ॥१॥
नाही त्या विटाळ अखंड सोवळी । उपाधी वेगळी जाणिवेच्या ॥२॥
मन हे निश्र्चिळ झाले एके ठायी । तया उणे काई निजसुखा ॥३॥
तींचि पुण्यवंते परउपकारी । प्रबोधी त्या नारी नरलोका ॥४॥
तुका म्हणे त्याचे पायी पायपोस । होऊनिया वास करीन तेथे ॥५॥
