वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

काय मानू आता निश्चिं

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075269 · अभंग क्र. ११४

114.
काय मानू आता निश्चिंति देहासी । हा तो काळामुखी जाईल की ॥१॥
वाउगा वाढलो वाउगा पोसलो । वाउगाचि झालो हाव भरी ॥२॥
न घडेचि कांही संतांचे पूजन । नोहे सेवा जाण करू त्यांची ॥३॥
याति हीन देह करी कळकळ । लागली तळमळ कैसे करू ॥४॥
बाळ तरूणपण नासले या लोभे । अवघे माझे म्हणितले ॥५॥
आता अवसान सेवटासी आले । अवघे पळाले टाकोनिया ॥६॥
झाकिले डोळे उघडे ते केले । न दिसे आपुले कोणी आता ॥७॥
चोखा म्हणे मज आलासे गहिवर । न सुचे विचार काय करू ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग