वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

का रे स्फुंदतोसी । न

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075183 · अभंग क्र. १०९

109.
का रे स्फुंदतोसी । न भजता विठ्ठलासी नरकी पडसी ॥
पुण्यपाप बाधा । न पवसी गोविंदा पावशील आपदा ।
स्मर परमानंदा ॥
पुण्य करिता स्वर्ग पाप करिता भोग ।
नाम जपता सर्वांग । होईल पांडुरंग ॥
देही आत्मा जव आहे । तव करुनिया पाहे ।
अंती कोणी नोव्हे । धरी वैष्णवांची सोय ॥
जाईल हे आयुष्य । न सेवी विषयविष पडतील यमपाश ।
वेगी करी सौरस ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठली मन चरणी गोंवी ।
हरपले देहभावी । जालासे गोसावी एकरुप ॥

अर्थ :
अरे कोणत्या गर्वाने फुललेला आहेस, तो गर्व सोड विठ्ठलाचे नाव घे नाहीतर नरकात पडशील. याच गर्वामुळे पापपुण्याची बाधा होऊन गोविंद स्वरूपास प्राप्त होणार नाहीस म्हणून त्या परमानंदाचे स्मरण कर. पुण्य केलेस तर स्वर्ग मिळेल तर पाप केलेस तर जन्म भोग व नाम जपलेस तर पांडुरंग प्राप्त होईल. देहात चैतन्य आहे तोपर्यतच हे करुन पाहा. शेवटी वाचवणारे कुणी नसून संतसंगती उपयोगी पडेल. या विषयाच्या विषाचे सेवन करीत राहिलास तर यमपाश पडेल व आयुष्य संपून जाईल तेव्हा त्वरीत नाममार्ग आपलासा कर. तसे केल्याने मनास गोसावीपण मिळून तू एकरूप होशील देहभान हरपेल व माझे पिता व रखमा देवीचे पती असणारे श्रीविठ्ठल चरणावर मन गुंतव असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग