रसज्ञ रसाचार रसामाजी
107.
रसज्ञ रसाचार रसामाजी वसे । जीवन हे सोसे असोस होय ॥१॥
ते रूप स्वरूपाचे रूपीच वोळले । कंदर्पे घोळिले नंदाघरी ॥२॥
नाही त्या आकार अवघाची वैकुंठ । अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥३॥
निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ । श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥४॥
अर्थ:
जसे रसज्ञ आपल्याला आवडता रस अनेक पदार्थातुन ओळखुन नेमक्या पदार्थात घेतात त्या प्रमाणे पृथ्वीवर पाणी अपार आहे पण प्रत्येक जीव त्याला आवश्यक पाणीच घेतो. मदनाला वाटले आपला ही शिरकाव गोकुळात कृष्णा बरोबर होईल पण कृष्णाने त्याला पार घुमवुन बेजार केले. त्या रुप नसलेल्या ब्रह्माने गोकुळच नाही तर सर्व चराचर धनदाट पध्दतीने व्यापुन टाकले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो कृष्ण प्रकाशमान असुन त्याच्या शरिराचा वरचा भाग स्वर्गलोक मधील भाग मृत्युलोक व कंबरेखाली पाताळ लोक स्वरुपात जरी असला तरी मला तो एकत्वाने ब्रह्मरुपातच दिसतो.
