निरसिता निरसले अवचित
108.
निरसिता निरसले अवचिता स्वरूप ।
तेचि भरले रूप नयनी माझ्या ॥१॥
झाडीता झाडेना काढिता काढेना ।
नेणो काय मना केले येणे ॥२॥
जे जे पडे दृष्टी ते ते पडे मिठी ।
नवल या गोठी कोण जाणे ॥३॥
बहेणि म्हणे माझे व्यापिले मानस ।
लावियेले पिसे काय सांगो ॥४॥
