भिंगाचे भिगुलें खांद
108.
भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुले । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥
येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥
गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥
कडदोरा बिंद्ली वाघनखे साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥
पायी घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥
एका जनार्दनी एकत्व शरण । जीवे निबंलोण उतरती ॥६॥
