घेई घेई माझे वाचे ।
109.
घेई घेई माझे वाचे । गाडे नाम विठोबाचे ॥१॥
तुम्ही घ्यारे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥३॥
मना तेथे धांव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥५॥