काय हे दु:ख किती ह्य
115.
काय हे दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनिया ॥१॥
जन्मावे मरावे हेचि भरोवरी । चोऱ्यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥
तुम्हांसी करूणा न ये माझी देवा । चुकवा हो गोवा संसाराचा ॥३॥
चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवे ॥४॥
