वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

अंडज जारज स्वेदज उद्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075055 · अभंग क्र. ११५

115.
अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे ।
हरिनाम नाटे ते बरवे ॥
जे नाटे ते नाम चित्ती ।
रखुमादेवी पती श्रीविठ्ठलाचे ॥
शरीर आटे संपत्ति आटे ।
हरिनाम नाटे ते बरवे ॥
बापरखुमादेविवरांचे नाम नाटे ।
युगे गेली परी उभा विटे ॥

अर्थ :
अंडज, जारज, स्वेदज, उव्दिज या चार खाणीतील सृष्टी नष्ट होते पण परमात्म्याचे नाव नष्ट होत नाही. रखमादेवीचा पती श्री विठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही म्हणून चित्तात धरावे. शरीर व संपत्ती ही संपणारी आहे पण विठ्ठलाचे नाम उत्तम असून नष्ट होत नाही. रखुमा देवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही याचा पुरावा म्हणजे युगानुयुगे विटेवर उभा असणारा श्रीविठ्ठल आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग