परब्रम्ह निष्काम तो
111.
परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
म्हणती गौळणी हरीची पाउले धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपत छपत येतो हरी हा राजभुवनी । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनी ॥३॥
सांपडला देव्हारी यासी बांधा दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडले देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा । जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥
