परेचे परते त्याहुनी
114.
परेचे परते त्याहुनी परते ।
सारोनीया चौथे पाहे पा रे ॥१॥
तेचि ते होउनी पाहे पा तू कैसा ।
व्यर्थ दाही दिशा हिंडो नको ॥२॥
सच्चिदानंदाचा खुंटला संवाद ।
तुटलासे वाद जये ठायी ॥३॥
बहेणि म्हणे वस्ती मोडिली परेची ।
वार्ता ओंकाराची नाही नाही ॥४॥
