काय जाणो तुमचा महिमा
113.
काय जाणो तुमचा महिमा । मज न कळे अधमा ।
भक्तभाव प्रेमा । कांही न कळे विठोबा ॥१॥
गातो नाचतो भलते छंदे । आपुले मनाचे आनंदे ।
न कळे भेदा भेदे । मज कांही विठोबा ॥२॥
शरण संतांचे पायी । पडोन राहीन तये ठायी ।
उकच्छष्टासोयी । हीच आस विठोबा ॥३॥
चोखा म्हणे हेचि देई । वास सदा तुमचे पायी ।
मागणे दुजे नाही । हेचि एक विठोबा ॥४॥
