वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 13. श्रीकृष्णाचा वेध - अभंग १०३ ते ११८

दिव्य तेज झळकती रत्न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087149 · अभंग क्र. ११३

113.
दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥
कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरी बाहेरीं पाहता दिसे उघडा गे ॥२॥
आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम द्तां माझे मीपण जाय ॥३॥
मागे पुढे चहुकडे उघडे पाही । पाहावयासी गेले मजला ठक पडले बाई ॥४॥
बाहेरी पाहुं जाता आतंरी भासे । जे जे भासे ते ते येकीयेक समरसें ॥५॥
एका जनार्दनी जिवीचा जिव्हाळा । एक पणें पाहता न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग