देखिला अवचिता डोळा स
112.
देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥
अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥
खुटले येणे जाणे घर सासुर । नाठवे आपपर वेधियलें सुंदर । अति सब्राह्म व्यापिले कृष्ण पराप्तर नागर वो ॥३॥
सावजी कळलें आता लोधलें निर्गुणा । एका जनार्दनी कृपा केली परिपुर्णा । गगनी गिळियलें येणे उरी नुरेचि आपणा ॥४॥
