सकळ मंगळनिधी । श्री
111.
सकळ मंगळनिधी । श्री विठ्ठलाचे नाम आधी ॥
म्हण का रे म्हण का रे जना । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥
पतीत पावन साचे । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥
बापरखुमादेविवरू साचे । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥
अर्थ :
श्री विठ्ठलाचे नाम हेच सर्वात मोठे मंगल आहे मंगलाचे मंगल आहे. हे जन हो तुम्ही सतत श्री विठ्ठलाचे नाम वाचेने म्हणत रहा. श्री विठ्ठलाचे नाम हेच सत्य आहे व त्यामुळे पतित पावन होतात. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे नाम हेच सर्वोत्तम सत्य आहे असे माऊली म्हणतात.
