हरिभक्त समुदाव आनंदे
108.
हरिभक्त समुदाव आनंदे क्रीडा करी । निघाले पंढरी पहावया ॥
दिंडीया पताका टाळाचे गजर । वैष्णवांचा भारू क्रीडा करी ॥
धन्ये भीमातिर गर्जते अंबर । आम्हा हरिभक्ता माहेर जोडी जाली ॥
धन्य ते पंढरी मोक्षाची नगरी । बोधला सुखभरी आनंदरूप ॥
