वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › १५, मदालसा अभंग

श्रीगुरु देवराया प्र

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073084 · अभंग क्र. ११०

110.
श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा । अनादि मूळ तूंचि विश्वव्यापक बीजा ।
समाधि घेई पुत्रा स्वानंदाचिया भोजा । पालखी पहुडलिया नाशिंवत रे माया ॥१॥
जाग रे पुत्रराय जाई श्रीगुरुशरण । देह तू व्यापिलासी चुकवी जन्ममरण ।
गर्भवासु वोखटा रे तेथे दु:ख दारुण । सावध होई का रे गुरुपुत्र तू सुजाण ॥२॥
मदालसा म्हणे पुत्रा ऐक बोलणे माझे । चौर्‍यांशी घरामाजी मन व्याकुळ तुझे ।
बहुत सिणतोसि पाहता विषयासी वांझे । जाण हे स्वप्नरुप येथे नाही बा दुजे ॥३॥
सांडी रे सांडी बाळा सांडी संसारछंदु । माशिया मोहळ रे रचियेला रे कंदु ।
झाडुनि आणिखी नेला तया फुकटचि वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशे आनंदु ॥४॥
सत्व हे रज तम तुज लाविती चाळा । काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा ।
यासवे झणे जासी सुकुमारा रे बाळा । अपभ्रंशी घालतील मुकशील सर्वस्वाला ॥५॥
कोसलियाने घर सुदृढ पै केले । निर्गमु न विचारिता तेणे सुख मानियेले ।
झाले रे तुज तैसे यातायाती भोगविले । मोक्षव्दार चुकलासी दृढकर्म जोडले ॥६॥
सर्पे पै दर्दुर धरियेला रे मुखी । तेणेंहि रे माशी धरियेली पक्षी ।
तैसा नव्हे ज्ञानयोगु आपाअपणाते भक्षी । इंद्रिया घाली पाणी संसारी होई रे सुखी ॥७॥
पक्षिया पक्षिणी रे निरंजनी ये वनी । पिलिया कारणे रे गेली चराया दोन्ही ।
मोहोजाळे गुतली रे प्राण दिधले टाकुनी । संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥८॥
जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला । तैसा नव्हे ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला ।
अनुभवी गुरुपुत्रा तोचि स्वये बुझाला । ऐक त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग