कृष्णमूर्ती होय गे क
109.
कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगु काय गे ॥१॥
तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥
पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढे निजदास गें ॥३॥
भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनी विटे जोदियेले पाय गे ॥४॥
