वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

गोत वित्त चित्त गोता

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090098 · अभंग क्र. ११३

113.
गोत वित्त चित्त गोतासी अचुक । चाळक पंचक तत्वसार ॥१॥
ते जप सादृश्य कृष्णनाम सोपे । नंद यशोदाखोपे बाळलीला ॥२॥
निरसूनि गुण उगविली खूण । गोकुळी श्रीकृष्ण खेळे कैसा ॥३॥
निवृत्तिचे सार कृष्णनामे पार । सर्व हा आचार हरिहरी ॥४॥

अर्थ:
जो आपल्या मनाचा, वित्ताचा चालक आहे.आपले गोत कोण असावेत हे ठरवतो तोच पंचकोष व पंचभुतांचा चालक आहे.त्याच परमात्मा श्रीकृष्णाचे नाम येवढे सोपे आहे जेवढ्या त्याच्या बाळलिला नंद यशोदेच्या घरात सहज वाटतात. तिन्ही गुणाचा निरास करुन हे परमात्म स्वरुप गोकुळात उगवले आहे ते गोकुळात अनेक खेळ करुन दाखवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ह्या कृष्णनामाने पार होणाचे सार असे आहे की आपला सर्व आचार हरिरुप करणे मग पार होणे सोपे आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग