कालिया मर्दना
113.
कालिया मर्दना
कालिंदीचे डोही काळियाची वस्ती । ऐक परीक्षिती चरित्र हे ॥१॥
पक्षीश्वापदांनी सोडियेले स्थळा । निघताती ज्वाळा तया डोही ॥२॥
विषाचियायोगे झाडे जळताती । जीवन न घेती कोणी त्याचे ॥३॥
वैकुंठनायक तया वनी आला । गोपाळांचा मेळ बरोबरी ॥४॥
हुहुतु हमामा लपंडाई खेळती । देवासी ह्मणती लपे आता ॥५॥
तृषाक्रांत गाई झाले ते गोपाळ । पिती तेव्हा जळ कालीयाचे ॥६॥
लहानाली मुले नाही तया ज्ञान । झाले गतप्राण सकळांचे ॥७॥
नामा ह्मणे तेव्हा कृपादृष्टी पाहात । उठवी समस्त गायी गडी ॥८॥
