वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

अष्टांगयोगे न शिणिजे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075069 · अभंग क्र. ११४

114.
अष्टांगयोगे न शिणिजे ।
यम नेम निरोध न कीजे रया ॥
वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे ।
गांता वंता श्रवणी ऐकीजे रया ॥
गीताछंदे अंग डोलिजे ।
लीला विनोदे संसार तरिजे रया ॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु नामे ।
जोडे हा उपावो कीजे रया ॥

अर्थ :
अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, स्नान, तितिक्षा ह्यामध्ये उगाच श्रमण्यात काही अर्थ नाही. ज्या पेक्षा त्या परमात्म्याचे गुण गायन करा व कोणी दुसरा करत असेल श्रवण करा. त्या गुणगीतांमुळे अंग डोलायला लागते. व त्याच्या लिला श्रवणाने संसारातुन तरुन जाता येते. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांच्या नामस्मरणाचा उपाय हा तारक आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग