वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

रात्र काळी घागर काळी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073229 · अभंग क्र. ११५

115.
रात्र काळी घागर काळी । यमुनाजळे ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवार काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी । कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाणीया नवजाय साजणी । सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी । कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग