वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

देखोनि ते यशोदा ऐकोन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089821 · अभंग क्र. १०७

107.
देखोनि ते यशोदा ऐकोनि गोठी ।
क्रोधे संतप्त झाली पोटी ।
म्हणे हा चोरिया करिता महा हाटी ।
न राहेचि मी काय करु ॥१॥
किती तरी हे अपवाद ।
सोसू जनाचे वेवाद ।
उदंड सांगताहि हा गोविंद ।
न सांडीचि खोडी आपुली ॥२॥
मग म्हणे तू गोपाळा ।
न संडिशीचि आपुला चाळा ।
शिक्षा लावीन याचि वेळा ।
मग तू शहाणा होशील ॥३॥
यावरी नेदी घरात येऊ ।
तुजला न घाली खाऊ जेऊ ।
तुझिया खोडी माझा जिऊ ।
बहुत तपिंनला या काळे ॥४॥
मग लाऊनिया दावे गळा ।
नेऊनि बांधला त्या उखळा ॥
म्हणे सांडिता ऐसा चाळा ।
तुज सर्वथा न सोडी ॥५॥
हासती भोवत्या अवघ्या नारी ।
म्हणती करिशील आता चोरी ।
नासिंले खादले ते आजिवरी ।
फावले ऐसे म्हणो नको ॥६॥
यावरी येशी आमुचा घरा ।
चोरीये जरी दधीक्षीरा ।
तरी नेऊनिया कौसासुरा ।
हाती देऊ तुजलागी ॥७॥
ऐसे बोलोनिया सुंदरा ।
गेल्या आपुलिया मंदिरा ।
यशोदा म्हणे रे चक्रधरा ।
घरी काय उणे तुज ॥८॥
निळा म्हणे बोले हरी ।
गोड न लागेचि ते निर्धारी ।
चोरियेचेचि आवडे भारी ।
करील याहिवरी चोरीया ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग