आरंभी आवडी आदरे आले
112.
आरंभी आवडी आदरे आले नाम ।
तेणे सकळ सिद्धी जगी जाले पूर्ण काम ॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा ।
तू माय माऊली जीवी जिव्हाळा ॥
तुझियेनि नामे सकळ संदेहो फिटले ।
बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥
अर्थ :
सुरवाती पासुनच आदराने व आवडीने नामस्मरण केल्याने मला सकळ सिध्दी प्राप्त झाल्या व माझी सर्व कामे पुर्णत्वाला गेली. ज्याला रामकृष्ण गोविंद गोपाळ म्हंटले जातो तो परमात्मा माझ्या जीवाचा जिव्हाळा आहेस नव्हे नव्हे तोच माझी आई आहे. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाच्या नामाने माझे सगळे संदेह फिटुन गेले असे माऊली सांगतात.
