वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 4. काला अभंग प्रकरण › ५, दहीहंडी फोडण्याचा अभंग

दहीहंडी असल्यास हा अ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073015 · अभंग क्र. १११

111
दहीहंडी असल्यास हा अभंग म्हणावा
शेवटच्या चरणामध्ये टोका नावाचा शब्द आहे,
जेव्हा शेवटचे चरण म्हटले जाईल, तेव्हा मृदंगाच्या हातोडीने दहीहंडी फोडावी.

दहीहंडी कोणी फोडावी?.

कीर्तनकाराच्या हाताने किंवा
एखाद्या शुद्ध आचरणाच्या वारकऱ्यांच्या हाताने किंवा
ते उपस्थित नसल्यास एखाद्या सात्विक भाविक भक्ताच्या हाताने दहीहंडी फोडावी आणि

तेही उपस्थित नसल्यास लहान बालक जे अजान आहे ज्यांना भल्या भुरियाची अजून जाण नाही त्या बालकाच्या हाताने दहीहंडी फोडावी.
दहीहंडी फोडताना ती जमिनीवर पडू देऊ नये व त्यातील प्रसाद सुद्धा खालून मोठं स्वच्छ कपडा म्हणजे उपरणं किंवा एखादं भांड सर्वांनी धरावा व त्यामध्ये ती वरच्यावर अलगद फुटलेली दहीहंडी घ्यावी.

आजि ओस अमरावती । काला पाहावया येती ।
देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी ।
तटस्थ त्या ध्यानी । गाई झाल्या श्‍वापदे ॥२॥
जे या देवांचे दैवत । उभे असे या रंगात ।
गोपाळांसहित । क्रिडा करी कान्होबा ॥३॥
तया सुखाची शिराणी । तीच पाऊले मेदिनी ।
तुका म्हणॆ मुनी । धुंडिता न लभती ॥४॥

चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी । मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदे कवळ देती एका मुखी एक । न म्हणती सान थोर अवघी सकळीक ॥२॥
हमामा हुंबरी पांवा वाजवितो मोहरी । घेतलासे फ़ेर माजी घालुनिया हरी ॥३॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरली देहभाव शंका नाही चित्ती ॥४॥
पुष्पांचा वर्षाव झाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनिया माळा घालतील कंठी ॥५॥
यादवांचा राणा मनोहर कान्हा । तुका म्हणॆ सुख वाटे देखोनिया मना ॥६॥
शिंके लावियेले दुरी । होतो तिघांचे मी वरी ॥१॥
तुम्ही व्हा रे दोहीकडे । मुख पसरुनी गडे ॥२॥
वाहाती त्या धारा । घ्या रे दोहीच्या कोपरा ॥३॥
तुका म्हणे हाती टोका । अधिक उणे नेदी एका ॥४॥

दहीहंडी फोडून झाल्याच्या नंतर
दहीहंडीतील काला वाटताना पुढील अभंग म्हणावा

कंठी धरिला कृष्णमणी । अवघा जनी प्रकाश ॥१॥
काला वाटू एकमेका । वैष्णव निका सम्भ्रम ॥२॥
वाकुलिया ब्रह्मादिका । उत्तम लोका दाखवू ॥३॥
तुका म्हणे भूमंडळी । आम्ही बळी वीर गाढे ॥४॥

कृपया यामध्ये काही आवश्यक सुधारणा असल्यास
संपर्क करावा
धनंजय महाराज मोरे रिसोड वाशिम
📞
9422938199

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग