धेनुकासुर वध
112.
धेनुकासुर वध
आनंदे खेळत । राम नडी कृष्णनाथ ॥१॥
गडी ह्म-णती रामा । ताडफळे देई आत्मा ॥२॥
सकळ मिळोनि । आले धेनूकांचे वनी ॥३॥
वृक्ष खालवोनी । फळे पाडिली मेदिनी ॥४॥
येत धांवोनी असुर । करी तयाचा संहार ॥५॥
भक्तांचा अंकित । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥६॥
