आद्यरूपसार जेथुनि ऊँ
110.
आद्यरूपसार जेथुनि ऊँकार । तो प्रणव साचार हारपला ॥१॥
ते रूप समर्थ रामकृष्णनाथ । गोपिका कृतार्थ नाम घेता ॥२॥
ब्रम्हांड घडले अनंत घटमठ । आपोआप धीट मुनिजना ॥३॥
निवृत्तीचे सार सर्व हा परिकर । कृष्णचि साकार बिंबिलेसे ॥४॥
अर्थ:
वेदाना ह्या ब्रह्मस्वरुपाची निर्मिती कळली नाही त्या रुपातुन ॐकार प्रगट झाला व तो ॐकार प्रणव त्या ब्रह्मरुपातच हारपला. त्याच ब्रह्मस्वरुपाने रामकृष्ण हे सगुण रुप घेतले व त्याच रामकृष्ण नामाचा घोष करुन गोपिका कृतार्थ झाल्या.त्याच ब्रह्मस्वरुपाने अनंत जगताची निर्मिती केली व त्याच्या पासुन झालेल्या ऋषीनी धीट होऊन मठांची निर्मिती केली. निवृत्तिनाथ म्हणतात, ह्या सर्वाचे सार असलेले कृष्णरुप म्हणजेच परिपूर्ण ब्रह्मस्वरुप आहे व त्याच्या तेजाने जगत प्रकाशमान झाले आहे.
