वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

देशे काळे वर्तमाने ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089940 · अभंग क्र. १११

111.
देशे काळे वर्तमाने ।
न धरी संकोच काही मने ।
मी तो ऐसाचि हे शहाणे ।
जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥१॥
तव तो आला अकस्मात ।
नारदमुनी गात नाचत ।
वंदूनिया श्रीकृष्णनाथ ।
कीर्ति विर्णित कृष्णाची ॥२॥
म्हणे उध्दरिले विमलार्जुन ।
शापदग्ध हे कुबेरनंदन ।
भविष्य जाणोनिया दर्शन ।
घ्यावया तुझे पातलो ॥३॥
परात्पर तू परत्पर तू परमानंद ।
योगी हत्कमळींचा मकरंद ।
सगुणरुपिया सच्चिदानंद ।
यशोदेअंकी क्रीडसी ॥४॥
स्तविता तूते भागल्या श्रुती ।
मग त्या ठेलिया निवांती ।
त्या गापिकारुपे गोकुळा येती ।
तुजसी अंगसंग करावया ॥५॥
मग नमुनी यशोदेप्रती ।
म्हणे तू वो भाग्यवंती ।
परमात्मा हा विश्रवतोमूर्ती ।
तुझिये अंकी विराजला ॥६॥
निळा म्हणे वदोनी ऐसे ।
नारद गेला निज उददेशे ।
यशोदा ऐकोनिया निज मानसे ।
परम संतोष पावली ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग