वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

व्याप्तरूपे थोर व्या

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090178 · अभंग क्र. १०९

109.
व्याप्तरूपे थोर व्यापक अरूप । दुसरे स्वरूप नाही जेथे ॥१॥
ते अव्यक्त साबडे कृष्णाचे रुपडे । गोपाळ बागडे तन्मयता ॥२॥
उन्मनि माजिटे भोगिती ते मुनी । मूर्तिची पर्वणी हृदयी वसे ॥३॥
निवृत्ति कारण कृष्ण हा परिपूर्ण । यशोदा पूर्णघन वोळलासे ॥४॥

अर्थ:
ज्या निर्गुणरुपाने सर्व जगत व्यापले आहे त्यारुपाच्या जागी दुसरे कोणतीही रुप नाही. त्याच रुपाने भाबडे सगुण कृष्णरुप धारण केले असुन ते गोपाळांत बागडत आहे. उन्मनी ह्या स्वरुप ज्ञानाच्या प्रकाराने मुनी त्या रुपाचा आनंद उपभोगुन ती कृष्णमूर्ती हृदयात स्थापित करतात. निवृत्तिनाथ म्हणतात, आपल्या कर्मामुळे हे कृष्ण हे रुप परिपूर्ण झाले आहे व ते रुप यशोदेचा पुत्र होऊन आल्या मुळे तिला महाधन प्राप्त झाले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग