पांखरू ३७७९
3779.
पांखरू ३७७९
कृष्णा एक पाखरू आहे । तेमुखाविणचारा खाये रे । डोळे नाही परी ते पाहे । वाचेवीणस्वयें गाये रे ॥१॥ सख्या त्याचे नांव कान्होंबा । कृष्ण म्हणती सर्व रे । त्याचे वास्तव्य कोठे आहे । पर नाही परी ते उडे रे ॥२॥ तिही लोकी हिंडतें । त्रिभुवन त्याला थोडेरे ॥३॥ त्याचे नखांत आकाशबुडे । तो सन्मुख चहुकडें रे ॥४॥ अहो त्यालामायबाप दोन्ही नाही रे । एकपणेंवीण पहातीजनार्दनाचे पायी रे ॥५॥
