मुलगी ३७६०
3760.
मुलगी ३७६०
आरते येग धाकुटे मुली । हीच कायतुमची बोली ॥१॥ घरादाराचे हितकर्ते । फुटक्या
मडक्याचे भोक बुजवितें ॥२॥ अटक मटक नऊवाटा । येऊन बसे दहा दारवंटा ॥३॥ दहा दारवंटातें कोण । तुझ्यांत गेले दोन ॥४॥ फटक माझे सवती । तुला सहाजण सोबती ॥५॥ पडले षडविकारांच्याहाती । सद्गुरुचे पाय धरी चित्ती ॥६॥ सद्गुरु कायदेईल ग मला । तन मन धन अर्पण करील त्याला ॥७॥ संसार जाईल सारा । उद्यां येईल काळाचाफेरा ॥८॥ आम्हीनर नारी पतिव्रता । विष्णुवर करूंसत्ता ॥९॥ एका जनार्दनी केला संग । योगीखेळविला पांडुरंग ॥१०॥
